स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांचे १८वे पुण्यस्मरण; गिरीश ओक यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाची सुरुवात

ओझर : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, मा. खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांच्या अठरावे व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या सोळावे पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दिनांक २७ मे रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
याकरिता पंचक्रोशीतील सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ,अशी विनंती श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. हा स्मृतिदिनाचा कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी सकाळी १० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेते डॉ. गिरीश ओक हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून ते आपले विचार येथे व्यक्त करणार आहेत.
स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन जनमानसांसाठी झिजवले. त्यांचे विचार व कर्तुत्व हे आमच्यासाठी व पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार असून त्याचा निरंतर ठेवा आम्ही करणार आहोत. त्यांचे स्थान हे आमच्या हृदयात ध्रुवताऱ्याप्रमाणे आहे, असे शेरकर कुटुंबिय व संचालक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.



