Girish Oak and Sukanya Mone : गिरीश ओक आणि सुकन्या मोने यांची जोडी तब्बल 30 वर्षानंतर एकत्र रंगभूमीवर
Girish Oak and Sukanya Mone : नाटकाचा शुभारंभ ३० मे २०२६ या दिवशी दुपारी ४.०० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार

Girish Oak and Sukanya Mone : अभिनेते गिरीश ओक आणि अभिनेत्री सुकन्या मोने यांची जोडी तब्बल 30 वर्षानंतर एकत्र रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या माध्यमातून हे दोन नाट्यकलाकार नाट्यप्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे बहुप्रतीक्षित नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.
या नाटकाचा विषय आधुनिक कुटुंबाच्या अवतीभोवती फिरतो. आताच्या कुटुंब पद्धतीत सगळी मंडळी सोशल मीडिया तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आहारी गेली आहे, याचा परिणाम कुटुंबावर कसा होतो? या सगळ्या गोष्टी या नाटकात पाहायला मिळणार आहे.
या नाटकाचा शुभारंभ प्रयोग ३० मे २०२६ शनिवार या दिवशी दुपारी ४.०० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे. तर दुसरा प्रयोग ३१ मे २०२६ रविवारी दुपारी ४.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. Girish Oak and Sukanya Mone
गिरीश ओक भावूक (Girish Oak and Sukanya Mone)
डॉ. गिरीश ओक भावूक होत म्हणाले, “सुकन्यासोबत ३० वर्षांनंतर नाटकात काम करताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याच प्रवासात तिचं आणि संजयचं लग्न आमच्या डोळ्यांदेखत झालं होतं. आज एका नव्या केमिस्ट्रीसह आम्ही एकत्र आलो आहोत. मी पनवेलच्या एका स्पर्धेत ही कथा एकांकिका स्वरूपात पाहिली होती आणि एक मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो होतो. हा विषय व्यावसायिक रंगभूमीवर येणं काळाची गरज आहे, असं वाटल्याने मी याचा पाठपुरावा केला.” (Girish Oak and Sukanya Mone)
यानंतर पुढे ते म्हणाले, “आजच्या काळात ‘निर्जीव फोन स्मार्ट होत चालला आहे आणि जिवंत माणूस बावळट’, हे भीषण वास्तव आहे. सोशल मीडियाचा निष्काळजी वापर आणि तरुण पिढीची बेफिकीरी यामुळे संपूर्ण कुटुंबावर कसं वादळ येऊ शकतं, यावर हे नाटक बोट ठेवतं.
एक अभिनेता म्हणून यातला ‘बाप’ साकारताना मला वैयक्तिक आयुष्यातही त्याची तीव्रता जाणवते. हे नाटक पालकांना आणि पाल्यांना एकत्र आणून एक निश्चित दिशा देईल, असा मला विश्वास आहे.”
तर सुकन्या मोने म्हणाल्या की, “२०१४ मध्ये ‘सेल्फी’ हे नाटक केल्यानंतर मी रंगभूमीपासून दूर होते. मात्र ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाची संहिता वाचताच ती मनाला भिडली आणि पुन्हा नाटकाकडे वळण्याची इच्छा झाली.
‘कुसुम मनोहर लेले’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर गिरीश ओक यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप खास आहे. आमच्यातील समजूत आणि ट्युनिंग इतकी सहज आहे की अनेकदा संवादांशिवायही आम्ही एकमेकांना समजून घेतो.” Girish Oak and Sukanya Mone
दरम्यान, या नाटकात सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेटे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहे. या महत्त्वपूर्ण नाटकाचे सशक्त लेखन आणि दिग्दर्शन संदिप दंडवते यांनी केले आहे.
हेही वाचा:






