केंद्रात 2024 मध्ये भाजपचे नव्हे तर जनतेचे सरकार येईल; ममता बॅनर्जी

कोलकता – देशात 2024 यावर्षीची लोकसभा निवडणूक भाजपला नाकारण्यासाठी होईल. त्यामुळे केंद्रात भाजपचे नव्हे; तर जनतेचे सरकार येईल, असे भाकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी केले.
येथे झालेल्या तृणमूलच्या सभेत बोलताना ममतांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. पुढील लोकसभा निवडणुकीत जनादेशामुळे भाजपला सत्ता सोडावी लागेल. त्या पक्षाला स्वबळावर बहुमत मिळणार नाही. त्यानंतर पुढील सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्ष एकवटतील, असा दावा त्यांनी केला.
अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या “या” नेत्यावर ईडीची कारवाई
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून जनताविरोधी पाऊले उचलली जात आहेत. खाद्यान्नावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लादला जात आहे. देशातील जनता खाणार काय? गरीब जगणार कसा, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. महाराष्ट्रातील सरकार पाडल्यानंतर बंगाल आणि इतर राज्यांतही तसेच करण्याची भाषा भाजप बोलत आहे. मात्र, बंगालमध्ये तसा प्रयत्न झाल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा ममतांनी दिला.
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षात फुट; प्रक्रियेपासून “हा” पक्ष राहणार दूर





