मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील घरावर जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी मोठा झटका मानली जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर ईडीने राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. नवाब मलिक यांचेही नाव कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले होते. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांचे नाव दाऊदशी जोडण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सीजी हाऊसमधील घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीसोबत झालेल्या व्यवहाराप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची दोनवेळा चौकशी झाली होती. पण त्या चौकशीतून समाधनकारक माहिती मिळाली नव्हती.
दरम्यान, वरळी येथील सीजे हाऊस ही एक मोठी इमारत आहे. याच इमारतीच्या बांधकामाआधी तिथे एक छोटीसी इमारत होती. ती इमारत गॅंगस्टार इक्बाल मिर्चीच्या ताब्यात होती. ती इमारत प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने पुनर्विकासित केल्याची माहिती समोर आली होती.
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षात फुट; प्रक्रियेपासून “हा” पक्ष राहणार दूर
त्या इमारतीच्या जागेच्या मोबदल्यात पटेल यांच्या कंपनीकडून इक्बाल मिर्ची आणि त्याच्या नातेवाईकांना जागा आणि पैसे दिल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. ईडीकडून कागदपत्रांची छाननी केली गेली. अनेक दिवसांपासून तपास सुरु होता. अखेर या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची दोनवेळा चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांच्या सीजे हाऊसमधील घरावर जप्तीची कारवाई केली आहे.
नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैला? किती असेल वेतन ? जाणून घ्या राष्ट्रपतींचे अधिकार