Devendra Fadnavis : “कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असे मंडळी…”; विरोधकांच्या आंदोलनावर फडणविसांची टीका
Devendra Fadnavis : या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि भास्कर भगर, राजाभाऊ वाजे, निलेश लंके यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

Devendra Fadnavis : कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि भास्कर भगर, राजाभाऊ वाजे, निलेश लंके यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. मात्र काही वेळातच पोलिसांनी कार्यकर्त्यांसह नेत्यांना ताब्यात घेतले.
कांदा दरावरून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “कालच केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव साडेतीन रुपयांनी वाढवून जवळपास पंधरा रुपयांपर्यंत नेलेला आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी देखील सुरू केलेली आहे. आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती.
Central Goverment: LPG नियमात पुन्हा बदल ; पाईप गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
उद्या संध्याकाळी त्या संदर्भात बैठक होणार आहे. कांद्याच्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकार चर्चा करत आहे. पंधरा रुपयांची खरेदी आपण सुरू केली आहे. Devendra Fadnavis
‘शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार संवेदनशील’ (Devendra Fadnavis)
शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्यातलं सरकार संवेदनशील आहे. पण काही लोक विनाकारण याबाबत राजकारण करू इच्छितात. त्यांना माझं सांगणं आहे की, राज्य आणि केंद्र सरकारने 15 रुपयांनी कांदा खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी असा निर्णय केला होता का ते दाखवा, तो कधीच दिसणार नाही.
आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करत आहोत. आम्हाला याची कल्पना आहे की, इतके करून भागणार नाही, अनेक गोष्टी कराव्या लागतील, त्यामुळेच केंद्र सरकारसोबत उद्या बैठक आम्ही घेत आहोत. त्या बैठकीतून दीर्घकालीन उपाययोजना काय करता येतील याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे शंभर टक्के राजकीय आंदोलन आहे.

Devendra Fadnavis : “कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असे मंडळी…”; विरोधकांच्या आंदोलनावर फडणविसांची टीका
कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असे मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महायुतीचे सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेने काम करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. Devendra Fadnavis
तर सध्या राज्यात सुरू असलेल्या इंधन खरेदी आणि वाढत्या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, “पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यात कुठेतरी साठेबाजी होत आहे, असे देखील निदर्शनास येत आहे. त्यासंदर्भात पुरवठा आणि गृह विभाग आता कारवाई करतील,” असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
Watermelon or Muskmelon: उन्हाळ्यात टरबूज की खरबूज? जाणून घ्या कोणतं फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर





