सातारा, (प्रतिनिधी) – स्व. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यात समाजकारण आणि सहकाराच्या माध्यमातून अलौकिक अशी क्रांती घडवली आहे. अजिक्य उद्योग समुहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्यातील असंख्य गावात विविध सहकारी संस्थाचे जाळे निर्माण करून त्यांनी सर्वांना सहकारातून समृद्धीकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला.
त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरून वाटचाल करत कायम शेतकरी हित जोपाण्यासाठी सहकार चळवळ जोमाने सुरु ठेवू, असा निर्धार स्व. आ. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीदिनी करण्यात आला.
सातारा तालुक्याचे भाग्यविधाते व अजिक्य उद्योग समुहाचे संस्थापक स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमीत्त गुरुवारी सकाळी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि. शेंद्रे कार्यस्थळावरील अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावरील पुर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर लोटला.
भाऊसाहेब महाराजांना विविध मान्यवरांनी विनम्र अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली. भाऊसाहेब जयंतीनिमित्त विविध अनाथाश्रम, शाळा, वृद्धाश्रम आदी ठिकाणी मिष्टान्न वाटप करण्यात आले. विविध सहकारी संस्थांमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात झाला.
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, संचालक मंडळातील सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव,
वनिता गोरे, सतीश चव्हाण, राजू भोसले, किरण साबळे- पाटील, सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, दादा शेळके, राहुल शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक ज्ञानदेव रांजणे, सौ. कांचन साळुंखे, सुरेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
भाऊसाहेब महाराज यांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो. या दिवशी एकत्र येवून सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले महान कार्य, त्यांची विचारसरणी आत्मसन्मानपूर्वक वागणुक, निस्वार्थी व अभ्यासू वृत्ती आदी बाबत त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांची कास धरून सहकार चळवळ वृध्दींगत करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.
स्व. भाऊसाहेब महाराजांनी अंगिकारलेली विकासकामाची धुरा त्यांचे आचार, विचार व जनसामान्यांच्या प्रेमळ पाठिंब्याच्या जोरावर जोमाने पुढे चालविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू, असे अभिवचन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिले.
कारखानास्थळावरील कार्यक्रमास प्रतापडग कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर, सातारा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुनिल काटे, जिल्हा सहकार बोर्ड अध्यक्ष धनाजी शेडगे, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण फडतरे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष जालिंदर महाडीक, संचालक वसंतराव टिळेकर, अजित साळुंखे,
माजी अध्यक्ष पंडीतराव सावंत, गणपतराव मोहिते, गणपतराव शिंदे, बाजार समिती सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार, संचालक अरूण कापसे, धनाजी जाधव, आनंदराव कणसे, विजय पोतेकर, फळे-फुले संस्थेचे अध्यक्ष पदमसिंह फडतरे,
तसेच अन्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, मजूर, युनियन अध्यक्ष कृष्णा धनवे, माजी अध्यक्ष सयाजी कदम, सातारा-जावली तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी व कामगार- कर्मचारी उपस्थित होते.