China Masters 2024 (Womens Doubles) : त्रिशा-गायत्रीचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का…

China Masters 2024 (Treesa Jolly & Gayatri Gopichand) : जागतिक क्रमवारीत 18व्या क्रमांकावर असलेल्या त्रिशा जॉली/गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीला चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. यामुळे स्पर्धेत भारतीय महिलांचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
LI-NING China Masters 2024
WD – R16
🇨🇳LIU Sheng Shu🏅
21 21 🇨🇳TAN Ning🏅
🇮🇳Treesa JOLLY
16 11 🇮🇳GAYATRI GOPICHAND PULLELA🕚 in 43 minutes
— BWFScore (@BWFScore) November 21, 2024
स्पर्धेत दुसऱ्या फेरीत भारतीय जोडीला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या लिऊ शेंग शू/टॅन निंग या जोडीकडून सरळ गेममध्ये 21-16, 21-11 असा पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, या भारतीय जोडीने पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या हू लिंग फँग आणि झेंग यू ची जोडीवर 21-15, 21-14 असा विजय मिळवत आगेकूच केली होती.
China Masters 2024 : सिंधू पाठोपाठ अनुपमा अन् मालविकाचेही आव्हान संपुष्टात….
महिला एकेरीतीलही आव्हान संपुष्टात…
भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूसह अनुपमा उपाध्याय आणि मालविका बन्सोड यांना गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शेन्झेन येथे चालू असलेल्या चायना मास्टर्समधील महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.





