BWF World Tour Finals 2024 : त्रिशा-गायत्री जोडीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

BWF World Tour Finals 2024, China (Hangzhou) | भारताची महिला दुहेरी जोडी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना शुक्रवारी चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ हँगझोऊ येथे BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2024 स्पर्धेतील तिसऱ्या आणि शेवटच्या गट सामन्यात जपानच्या नाओमी मात्सुयामा आणि चिहारू शिदा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. यासह भारतीय जोडीला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले तसेच पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आलं आहे.
Treesa Jolly and Gayatri Gopichand’s remarkable journey at the #BWFWorldTourFinal2024 comes to an end.
They battled hard but fell short, losing 17-21, 13-21 to 🇯🇵’s Nami Matsuyama and Chiharu Shida in the group stage, missing out on a semifinal spot.
Your efforts have inspired… pic.twitter.com/BYCBgHSCkk
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 13, 2024
बॅडमिंटन क्रमवारीत 13व्या क्रमांकावर असलेल्या त्रिशा जॉली-गायत्री गोपीचंद यांना पॅरिस 2024 ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या जपानच्या नाओमी मात्सुयामा आणि चिहारू शिदा यांनी 49 मिनिटे चाललेल्या सामन्यात 17-21,13-21 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. जपानी जोडीकडून त्यांचा हा चौथा पराभव ठरला.
बुधवारी भारतीय जोडीला चीनच्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग यांनी पराभूत केले होते. यानंतर भारतीय जोडीने मलेशियाच्या पर्ली टॅन आणि थिनाह मुरलीधरन यांचा पराभव करून आपल्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण शुक्रवारी दोघींनाही जपानी संघाचा सामना करता आला नाही आणि यासह त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
BWF World Tour Finals 2024 : दुसऱ्या सामन्यात त्रिसा-गायत्री जोडीचं जोरदार पुनरागमन…
दरम्यान, त्रिशा-गायत्री ज्यांनी नुकतेच लखनौ येथील सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 300 मध्ये एकत्रितपणे त्यांचे दुसरे BWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकले होते. त्या हंगामाच्या शेवटी BWF वर्ल्ड टूर फायनलसाठी पात्र ठरलेल्या एकमेव भारतीय खेळाडू होत्या.





