China Masters 2024 : सात्विक-चिरागचा विजयी धडाका कायम, स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मारली धडक….

China Masters 2024 (Satwiksairaj & Chirag) : भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीने शुक्रवारी डेन्मार्कच्या खेळाडूंचा पराभव करत चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडी सात्विक-चिराग यांनी डेन्मार्कची द्वितीय मानांकित जोडी किम अस्ट्रुप आणि अँडर्स स्कारुप रासमुसेन यांचा 21-16, 21-19 असा पराभव करत आगेकूच केली.
Indian men’s doubles pair of Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty beat second seeds Kim Astrup and Anders Skaarup Rasmussen of Denmark 21-16 21-19 to advance to semifinals of the China Masters Super 750 badminton tournament in Shenzhen #ChinaMasters pic.twitter.com/xLyeyO7pVz
— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2024
तत्पूर्वी, पुरुष दुहेरीत गुरूवारी दुसऱ्या फेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने 15व्या मानांकित डॅनिश जोडी रॅस्मस कजाएर आणि फ्रेडरिक सोगार्ड यांचा 21-19, 21-15 असा पराभव केला होता.
त्याआधी, पॅरिस ऑलिम्पिक झाल्यानंतर विश्रांती घेत पुनरागमन करणाऱ्या सात्विक आणि चिराग या जोडीने पहिल्या फेरीच्या लढतीत चायनीज तैपेईच्या ली झे हुई आणि यांग पो सुआन यांचा 12-21, 21-19, 21-18 असा पराभव केला होता. ही लढत 1 तास आणि सहा मिनिटे चालली.
China Masters 2024 : भारताचा स्टार शटलर ‘लक्ष्य सेन’ची उपांत्यपूर्व फेरीत धडक…
महिला दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात…
दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत 18व्या क्रमांकावर असलेल्या त्रिशा जॉली/गायत्री गोपीचंद या बॅडमिंटन महिला दुहेरी जोडीला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारतीय महिला जोडीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारतीय जोडीला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या लिऊ शेंग शू/टॅन निंग या जोडीकडून सरळ गेममध्ये 21-16, 21-11 असा पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, भारतीय जोडीने पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या हू लिंग फँग आणि झेंग यू ची जोडीवर 21-15, 21-14 असा विजय मिळवत आगेकूच केली होती.





