AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी खेळीने इंग्लंडचा उडवला धुव्वा, ६९ चेंडूत शतक झळकावत लावली विक्रमाची रांग

Travis Head smashed fastest Test century in AUS vs ENG 1st Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या ॲशेस २०२५-२६ मालिकेची सुरुवात अतिशय थरारक झाली आहे. पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयात मिचेल स्टार्क आणि ट्रॅव्हिस हेडने महत्त्वाची भूमिका बजावली.
यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने आपल्या बॅटचा तडाखा दाखवत इतिहास रचला आहे. २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हेडने केवळ ६९ चेंडूत अविश्वसनीय शतक झळकावले. विशेष म्हणजे या सामन्याच्या पहिल्या दिवशी १९ विकेट्स पडल्या होत्या. ज्यामुळे हा सामन्या दोन दिवसात संपला.
गोलंदाजांचे वर्चस्व आणि हेडचा पलटवार –
Travis Head keeps delivering, centuries when pressure peaks🔥
📸: Crictracker#Cricket #Ashes #AUSvsENG #TravisHead #Australia #WTC27 #TestCricket #Ashes2025 #AUSvENG pic.twitter.com/IkcPrRpPDd
— CricStats (@CricStatsINT) November 22, 2025
या सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले, जिथे तब्बल १९ विकेट्स पडल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १३२ धावांत आटोपला, तर त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ट्रॅव्हिस हेडला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. हेडने आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीत फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले.
हेही वाचा – Ricardo Gordon : इंग्लंडच्या क्रिकेटपटूला ठोकल्या बेड्या! चोरीची कार अन् धारदार शस्त्र बाळगल्याने अटक
ट्रेव्हिस हेडचे वादळी शतक –
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या डावात सलामीला उतरत ८३ चेंडूत १२३ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने १६ चौकार आणि ४ षटकारांची बरसात केली. ज्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली आणि ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला. मिचेल स्टार्कने पण या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IND A vs BAN A : १९४ धावांचा थरार बरोबरीत सुटला! पण सुपर ओव्हरमध्ये भारताचा घात; बांगलादेशचा रोमहर्षक विजय!
ट्रॅव्हिस हेडनी केली विक्रमांची बरसात –
- चेस मास्टरी: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वात कमी चेंडूत शतक ठोकणारा हेड हा पहिला खेळाडू बनला आहे.
- ॲशेस रेकॉर्ड: ॲशेसच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. या खेळीने त्याने १९०२ मध्ये गिलबर्ट जेसॉप यांनी लंडनमध्ये नोंदवलेला (७६ चेंडू) विक्रम मोडला. या यादीत ॲडम गिलख्रिस्ट (५७ चेंडू, २००६-०७) अजूनही अव्वल स्थानावर आहे.
- वॉर्नरशी बरोबरी: ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत संयुक्तपणे तिसरे सर्वात वेगवान शतक पूर्ण करत त्याने डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे.
- ट्रॅव्हिस हेडचे हे कसोटी कारकीर्दीतील १० वे शतक असून, या खेळीदरम्यान त्याने आपल्या ४००० कसोटी धावांचा टप्पाही यशस्वीपणे पार केला आहे. त्याच्या या वादळी खेळीने पहिल्याच कसोटीत बाजी मारली.





