Pune District : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल
Pune District : 13 जुलै रोजी सकाळी 8 वाजता ते 14 जुलै रात्री 8 वाजेपर्यंत सासवड पुणे, उरुळी मार्गे सातरा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करून ती बेलसर-कोथळे-नाझरे-काळा ओढा मार्गे मोरगाव कडे वळविण्यात येत आहे.

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी पालखी सोहळ्यानिमित्त 10 ते 15 जुलै 2026 या कालावधीत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील विविध प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात दरवर्षी सुमारे 7 ते 8 लाख वारकरी सहभागी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वारकर्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 115 अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण ः बेलसर फाटा : अ) 10 जुलै रोजी रात्री 8 ते 13 जुलै रोजी रात्री 8 वा. या वेळेत बारामती, फलटण, सातारा बाजुकडून येणारी पुणे वाजुकडे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पूर्णपणे बंद करुन बेलसर फाटा- वाघापुर चौक उरुळी कांचन मार्गे पुणे बाजुकडे वळवावी. (ब) 13 जुलै रोजी सकाळी 8 वाजता ते 14 जुलै रात्री 8 वाजेपर्यंत सासवड पुणे, उरुळी मार्गे सातरा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करून ती बेलसर-कोथळे-नाझरे-काळा ओढा मार्गे मोरगाव कडे वळविण्यात येत आहे.
मोरगाव चौक जेजुरी : अ) 11जुलै रोजी रात्री 8 वा. ते 14 जुलै रोजीचे दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुक नियमन करणे. (ब) 14 जुलै रोजी दुपारी 3 वा ते 15 जुलै रोजीचे रात्री 11 वा. सासवड, पुणे, उरुळी मार्गे सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्ण पुणे बंद करुन ती मोरगाव-लोणीभापकर-कोर्हाळे मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.
पारगाव मेमाणे चौक पारगाव ः अ) 11 जुलै रोजी रात्री 8 ते 13 जुलै रोजीचे दुपारी 5 वाजता पुण्याकडे जाणारी सर्व वाहतूक ही सासवड व जेजुरी बाजुकडे जाऊ न देता ती उरुळी मार्गे वळविण्यात येत आहे. (ब) 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजता ते 15 जुलै रोजीचे रात्री 11 वाजता सासवड, पुणे, उरुळी मार्ग सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती पिसर्वे-सुपा-लोणीभापकर-कोर्हाळे मार्ग फलटण कडे वळविणेत येत आहे.
छत्रपती शिवाजी चौक नीरा : दि. 10 जुलै रोजी रात्री 8 वाजता 15 जुलै रोजी 11 वाजता यावेळेत सातारा, फलटण, लोणंद येथुन पुणेकडे जाणेसाठी जेजुरी-सासवड वाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पुर्ण पुणे बंद करणेत येत आहे व ही वाहतूक नीरा मोरगाव-सुपा-कडेगाव-चौफुला मार्गे पुणे बाजुकडे वळविणेत येत आहे.
बेलसर गाव कोथळे चौक 10 जुलै रोजी रात्री 8 ते 14 जुलै रात्री 11 या वेळेत जेजुरी मार्गे सातारा, फलटण, लोणंद बाजुकडे सर्व वाहतुक पुर्णपणे बेद करुन सदरची वाहतुक वेलसर कोथळे चौक-कोथळेगाव-नाझरे काळा ओढा गोगाय किंवा नाझरे-पांडेश्वर मार्गे सुपा मोरगाव अशी वळवावी. जेऊर फाटा नवीन बायपास : 10 जुलै रोजी रात्री 11 या ते 15 जुलै रोजी रात्री 11 या वेळेत सातारा, फलटण, लोणंद येथून पुणे बाजुकडे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करुन जेऊर फाटा- मांडकी-वीर- सारोळा मार्ग सातारा हायवे पुणे अशी वळविणेत येत आहे.
भोरवाडी फाटा जेजुरी ः 14 रोजी दुपारी 3 वाजता ते 15 जुलै रोजी रात्री 11 सासवड, पुणे, उरुळी मार्ग सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती कोळविहीरे मोरगाव रोड-मोरगाव- लोणीभापकर को-ळाळे मार्ग फलटण कडे वळविणेत येत आहे. सुपा पोलीस स्टेशन, मोरगाव चौक ः अ) 12 जुलै रोजी रात्री 8 ते 14 जुलै रोजीचे दुपारी 3 वाजेपर्यंत बारामती, निरा मार्गे पुणे कडे जाणारी वाहतूक सुपा- कडेगाव चौफुला मागे वळविण्यात येत आहे. (ब) 14 जुलै रोजीचे रात्री 8 ते 15 जुलै रोजीचे रात्री 11 वाजता जेजुरी, चौफुला सुपा मार्गे सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे व्यतिरिक्त सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव-लोणीभापकर-कोर्हाळे मार्गे फलटणकडे वळविणेत येत आहे.
सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण: अ) 13 जुलै रोजीचे सकाळो 5 ते 15 जुलै रात्री 11 वाजेपर्यंत पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे सातारा, फलटण बाजुकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून सासवड-नारायणपूर- कापूरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परिंचे-वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळविणेत येत आहे. (ब) 13 जुलै सकाळी 5 ते 14 जुलै रोजी रात्री 11 वाजेपर्यंत पुणे बाजुकडुन जेजुरी मार्गे बारामती बाजुकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून सासवड-पारगाव मेमाणे-पिसवरे-सुपा मार्गे बारामती अशी वळविणेत येत आहे.
लोणंद पोलीस स्टेशन जि. सातारा ः 14 रोजी सकाळी 5 ते 15 जुलै रात्री 11 वाजेपर्यंत लोणंद बाजूकडून नीरा मार्ग व नवीन बायपास मार्गे पुणेकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून लोणंद-शिरवळ-कापूरहोळ-खेड शिवापूर मार्गे अशी वळविणेत येत आहे.





