Toxic Release Date : यशच्या ‘टॉक्सिक’ची रिलीज डेट जाहीर; डबल रोलची झलक समोर
Toxic Release Date : यशने 'टॉक्सिक’चे पोस्टर 'फादर्स डे'च्या मुहूर्तावर रिलीज केले

Toxic Release Date : अभिनेता यशच्या ‘टॉक्सिक’ या बहूप्रतिक्षित चित्रपटाची अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता अखेर चित्रपटाची नवी अधिकृत रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
‘टॉक्सिक’ हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सोबतच, मेकर्सनी या चित्रपटातील यशचा डबल रोल लुकही शेअर केले आहे. यशने ‘टॉक्सिक’ची रिलीज डेट आणि नवीन पोस्टर शेअर करत लिहिले आहे, ‘आपल्या वडिलांचा आदर करा…’
यशने हे पोस्टर २१ जून रोजी ‘फादर्स डे’च्या मुहूर्तावर रिलीज केले आहे. हे पोस्टर पाहून चाहते कमालीचे उत्सुक झाले असून ते आता चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटात यशसोबत कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, अक्षय ओबेरॉय, तारा सुतारिया, टोविनो थॉमस, नयनतारा, रुक्मिणी वसंत आणि सुदेव नायर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘टॉक्सिक’चे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे.
‘टॉक्सिक’ची श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटासोबत टक्कर
‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनासोबतच बॉक्स ऑफिसवर आणखी एक मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा आगामी ‘ईठा’ हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी म्हणजेच ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांनी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वी अनेकवेळा बदलण्यात आली. सुरुवातीला हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी रिलीज होणार होता, त्यानंतर तो १९ मार्च २०२६ ला रिलीज करणार असल्याचे सांगितले. परंतु, मेकर्सनी पुन्हा बदल करत ही तारीख ४ जून २०२६ अशी केली होती. अखेर आता या चित्रपटाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा:





