यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Toxic Poster | साऊथचा सुपरस्टार यश त्याच्या ‘KGF 2’ चित्रपटामुळे लोकप्रिय झाला. यानंतर आता चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. यातच यशने सोशल मीडियावर ‘टॉक्सिक’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
या पोस्टरमध्ये यश सूट आणि टोपी घालून, एका कारच्या जवळ सिगारेट ओढताना दिसत आहे. पोस्टरवर लिहिलं आहे, ‘त्याची अनुपस्थिती तुझ्या अस्तित्वाचं संकट आहे.’ या पोस्टरनंतर चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. दरम्यान, हा चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार याची माहिती यशने दिलेली नाही, मात्र चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. Toxic Poster |
यशने त्याच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. ज्यामध्ये त्याने एक तारीख लिहिली आहे ज्या दिवशी तो चित्रपटाशी संबंधित टीझर रिलीज करू शकतो, असे मानले जात आहे. पोस्टरमध्ये 8 जानेवारीची तारीख लिहिली आहे. Toxic Poster |
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा समावेश असल्याचे मानले जात आहे. मात्र निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित कोणत्याही अपडेटवर अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही. Toxic Poster |
यशचा ‘टॉक्सिक’ हा एक मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे, ज्यामध्ये बॉलिवूड तसेच दक्षिणेतील अनेक कलाकार काम करताना दिसणार आहे. पण त्याच्या चित्रपटात कोणाचा समावेश असणार आणि चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा:





