ब्लॅक ड्रेस अन् हातात बंदूक; ‘टॉक्सिक’ चित्रपटातील नयनताराचा फर्स्ट लुक

Nayanthara First Look | दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यात कियारा आडवाणी आणि हुमा कुरैशी देखील झळकणार आहे. नुकताच या चित्रपटातील ‘लेडी सुपरस्टार‘ नयनताराचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
नयनतारा ‘टॉक्सिक’ मध्ये ‘गंगा’ची भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये नयनतारा एका काळ्या रंगाच्या स्टायलिश हाय-स्लिट गाऊनमध्ये चालत येताना दिसते. तिच्या हातात बंदूक आणि डोळ्यात अंगार आहे. तिच्या या लूक पोस्टला खास कॅप्शन देत लिहिलं की, “‘अ टॉक्सिक फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’मध्ये ‘गंगा’च्या भूमिकेत नयनताराला सादर करत आहोत”. नयनताराचा हा किलर लुक सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
Introducing Nayanthara as GANGA in – A Toxic Fairy Tale For Grown-Ups #TOXIC #TOXICTheMovie
@advani_kiara @humasqureshi #GeetuMohandas @RaviBasrur #RajeevRavi #UjwalKulkarni #TPAbid #MohanBKere #SandeepSadashiva #PrashantDileepHardikar #KunalSharma #SandeepSharma #JJPerry… pic.twitter.com/FSiWGo7XeC
— Yash (@TheNameIsYash) December 31, 2025
नयनताराशिवाय कियारा अडवाणी ‘नादिया’च्या भूमिकेत दिसणार आहे. तर हुमा या चित्रपटात ‘एलिझाबेथ’ची भूमिका साकारत आहे. तसेच या चित्रपटात तारा सुतारिया देखील झळकणार असल्याची चर्चा असून, अद्याप त्याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. ‘टॉक्सिक’ चित्रपट हा ड्रग माफियांच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे. यशचा हा एक मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे, ज्यामध्ये बॉलिवूड तसेच दक्षिणेतील अनेक कलाकार काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा:





