‘टॉक्सिक’च्या सेटवरील व्हिडिओ लीक; यश आणि नयनतारा दिसले खास अंदाजात

Yash and Nayanthara | सुपरस्टार यश आणि अभिनेत्री नयनताराचा ‘टॉक्सिक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात नयनतारासह कियारा अडवाणी आणि हुमा कुरेशी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टचे फर्स्ट-लूक पोस्टर्स आधीच प्रदर्शित झाले असून, आता ‘टॉक्सिक’च्या सेटवरील यश आणि नयनताराचा BTS व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नयनतारा एका व्यक्तीकडे जाऊन हात मिळवताना दिसते, त्यानंतर यशही येतो. या दृश्यात नयनतारा काळ्या गाउनमध्ये, तर यश पांढऱ्या कपड्यांमध्ये स्टायलिश दिसत आहे. यासोबतच अभिनेत्री हुमा कुरैशी देखील दिसते. ही छोटीशी झलक पाहून चाहते आनंदी असले तरी काही नेटकऱ्यांनी या लूकची तुलना एका फ्लॉप हिंदी चित्रपटाशी केली आहे.
When Yash and Nayanthara share the same frame 😭🔥
Sister–brother energy is real 💀✨#ToxicTheMovie #Toxic #Yash #Nayanthara pic.twitter.com/nbgIw9SVXP— Ravikiran (@ravikirantweetz) January 1, 2026
काही युजर्सना या BTS क्लिपमधील विंटेज स्टाईल आणि वातावरणामुळे रणबीर कपूरच्या ‘बॉम्बे वेल्वेटची आठवण झाली. सोशल मीडियावर “बॉम्बे वेल्वेटसारखी फील येतेय”, “पुन्हा बॉम्बे वेल्वेट?” अशा प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत. 2015चा‘बॉम्बे वेल्वेट’ बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात अपयशी ठरला होता आणि केवळ 23.71 कोटींची कमाई केली होती. Yash and Nayanthara |
‘टॉक्सिक’च्या निर्मात्यांनी अलीकडेच नयनताराचा फर्स्ट-लूक पोस्टर रिलीज केला होता. ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास करत असून, कथा यश आणि गीतू मोहनदास यांनी लिहिली आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’शी टक्कर देईल. Yash and Nayanthara |
हेही वाचा:
“टीकाकारांना मी त्यांच्या वयाचा वाटतो, म्हणून…”; सचिन पिळगांवकरांनी ट्रोलिंगवर सोडलं मौन





