Toxic First Song Tabaahi: समुद्रकिनारी यश आणि कियाराचा खास अंदाज; ‘टॉक्सिक’ मधील गाण्याचं पोस्टर रिलीज
Toxic First Song Tabaahi: या चित्रपटाची गाणी एकूण ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर २ मार्चला हे गाणं अधिकृतपणे रिलीज केलं जाणार आहे.

Toxic First Song Tabaahi: दाक्षिणात्य सुपरस्टार यशला ‘केजीएफ’ चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर आता तो आणखी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ (Toxic First Song Tabaahi ) असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटातील पहिलं गाणं ‘तबाही’चं पोस्टर रिलीज केले आहे.
रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये यश आणि कियारा अडवाणी समुद्राच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. यशचा रांगडा लुक, तर पांढऱ्या शुभ्र शर्टमधील कियारा, या दोघांची केमिस्ट्री पोस्टरमध्येच जबरदस्त दिसत आहे. (Toxic First Song Tabaahi )
हे गाणं प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल मिश्रा याने गायलं असून संगीतबद्धही केलं आहे. या चित्रपटाची गाणी एकूण ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर २ मार्चला हे गाणं अधिकृतपणे रिलीज होईल.
View this post on Instagram
गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट एका गोव्यातील ड्रग कार्टेलवर आधारित गँगस्टर ड्रामा असल्याचं बोललं जातंय. यश या चित्रपटात ‘राया’ आणि ‘तिकीट’ अशा दोन वेगळ्या लुकमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.
कियारा अडवाणीसोबतच या चित्रपटात नयनतारा , हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १९ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
Baby Massage: दररोज मालिश केल्याने बाळाची हाडे मजबूत होतात का? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितली खरी गोष्ट





