Rohit Pawar: MPSC पेपरफुटीमागचा मोठा खुलासा; रोहित पवारांनी थेट पुरावे सादर करत नंदुरबारमधील अकॅडमीवर केला आरोप
Rohit Pawar: एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर फुटी प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर दावे केले आहेत.

Rohit Pawar: नीट पेपर लीक प्रकरणानंतर दिल्लीतील जंतरमंतरवर सलग महिनाभर चाललेल्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या रोषापुढे सरकार झुकलं. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन मागे घेण्यात आलं.
नीट पेपर लीकची घटना ताजी असताना आता महाराष्ट्रात एमपीएससीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर फुटी प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर दावे केले आहेत.
तसेच रोहित पवार यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात टीईटी, नीट, एसआरपीएफ, एचएससी केमेस्ट्री, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोतवाल भरती, तलाठी भरती, महाजनको अशा विविध परीक्षांचे पेपर लीक झाल्याचेही सांगितले आहे.
तसेच या परीक्षांसाठी गरिबांची मुलं खूप परिश्रम घेतात. पण महाराष्ट्रात पैसे देऊन आणि आपल्या विचाराची लोक यंत्रणेत असावी या हेतूने पेपर लीक केले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. (Rohit Pawar)
दरम्यान, एमपीएससीकडून राज्य औषध निरीक्षकाची परीक्षा २२ मार्च रोजी घेण्यात आली. याच परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्याकडे पुरावे असल्याचे सांगितले आहे. (Rohit Pawar)
कौटिल्य अकादमीवर रोहित पवारांचे आरोप (Rohit Pawar)
रोहित पवार यांनी सांगितले की, “नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीतील एका विद्यार्थ्याला १०० पैकी ९० प्रश्न आधीच मिळाले होते. २२ मार्च २०२६ ला परीक्षा होती. पण २० मार्च २०२६ ला परीक्षेचे प्रश्न मिळाले होते. त्यामुळे या मुलांना अभ्यास करता आला. पैसे मिळाल्यावर तो माणूस व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवायचा.
दोन ते तीन मिनिटांनी डिलिट फॉर ऑल करायचा. ते डाऊनलोड केलेले प्रश्न एकाने आपल्या मित्राला पाठवले. त्यामुळे त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. हीच चूक संबंधित परीक्षार्थीला महागात पडली आणि पेपर फुटीचं हे प्रकरण समोर आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी यावेळी काही चॅट्सही सादर केले. प्रश्न कसे पाठवले गेल्याचे पुरावे सादर केले. यासाठी तब्बल १२ लाख मोजल्याचा आरोप आहे.
बार्शी कनेक्शन दिसत असल्याचा आरोप (Rohit Pawar)
रोहित पवार म्हणाले, या प्रकरणात बार्शीचे कनेक्शन दिसून येत आहे. एक नायब तहसीलदारची मुलं आहेत. त्याच्या एका मुलाला १३ वा रँक आणि मुलीला १६ वा रँक आला आहे. आता हा योगायोग आहे का? हा प्रश्न आहे. यामध्ये बार्शी कनेक्शन आम्हाला कळलं आहे. काही मुलांनी MPSCकडे तक्रार केली पण त्यावर कोणतेही उत्तर mpsc कडून आलेलं नाही. अधिकारी विद्यार्थ्यांना धमकी देत आहेत की तुमच्यावर पोलीस कारवाई करू” असं रोहित पवार म्हणाले.
नेमक प्रकरण काय ?
तक्रारदारांच्या दाव्यानुसार, २२ मार्च रोजी झालेली औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका २० मार्च रोजीच व्हॉट्सअॅपवर उपलब्ध झाली होती. तसेच, गुणवत्ता यादीत काही उमेदवारांना मिळालेले गुण अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित अकादमीचे फॉरेन्सिक ऑडिट करून कॉल रेकॉर्ड्स तसेच व्हॉट्सअप चॅट रीट्रीव्ह करून कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. (Rohit Pawar)
हेही वाचा:
Nashik: आल्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल; सर्व मेहनत अन् खर्च वाया गेल्याची खंत





