Nashik: आल्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल; सर्व मेहनत अन् खर्च वाया गेल्याची खंत
Nashik: लागवडीचा खर्चही निघणे झाले कठीण

नाशिक : येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील शेतकरी बापू क्षीरसागर यांनी अर्ध्या एकर क्षेत्रात आल्याची लागवड केली होती. तब्बल १३ महिन्यांपर्यंत पीक जपण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत आणि मोठा खर्च केला. मात्र, काढणीच्या वेळी बाजारभावात घसरण झाल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
आल्याची लागवड केल्यानंतर तब्बल वर्षभर हे पीक शेतकऱ्याला सांभाळावे लागते. लागवड, खते, औषध फवारणी, मजुरी आणि इतर खर्च करून बापू क्षीरसागर यांनी अर्ध्या एकरात आल्याचे पीक घेतले.
पीक काढणीला येण्याच्या काही दिवसांपूर्वी आल्याला चांगला बाजारभाव मिळत होता. त्यामुळे काढणीच्या वेळीही चांगला दर मिळेल आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल, अशी शेतकऱ्याची अपेक्षा होती.

Nashik: आल्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल; सर्व मेहनत अन् खर्च वाया गेल्याची खंत
मात्र, प्रत्यक्षात पीक काढणीला आल्यानंतर आल्याचा बाजारभाव ७० ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरल्याचे शेतकरी सांगत आहेत. या दरात उत्पादन खर्च वजा जाता बापू क्षीरसागर यांना अवघे सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तब्बल १३ महिने पीक सांभाळून, मोठा खर्च आणि मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्याने आपली व्यथा व्यक्त केली आहे.
हेही वाचा:





