Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली ‘ही’ मोठी मागणी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची धुरा आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडींवर राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत सरकारला थेट घरचा आहेर दिला आहे.

Chhagan Bhujbal : नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभर उसळलेल्या संतापाच्या लाटेनंतर अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अभिजीत दिपके यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल महिनाभर (Chhagan Bhujbal) चाललेले आंदोलन, संसदेवरील मोर्चादरम्यान झालेला पोलीस लाठीचार्ज आणि विरोधकांचा वाढता दबाव यांमुळे केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची धुरा आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडींवर राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत सरकारला थेट घरचा आहेर दिला आहे.
संसदेवरील मोर्चात राडा: लाठीचार्ज आणि दगडफेक
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी संसदेवर धडक देण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी चकमक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अमानुष लाठीचार्ज केला, ज्यामध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. तर दुसरीकडे, आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे.
या घटनेनंतर देशभरात संतापाची तीव्र लाट पसरली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत सरकारला उघडे पाडले. विरोधी पक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळे केंद्र सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता.
“१५ दिवसांपूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता” – छगन भुजबळ
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले “जे काही घडले ते सर्व देशाच्या समोर आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी जर १५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता, तर जंतर-मंतरवरील महिनाभराचे आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज आणि देशात निर्माण झालेली ही संतापाची लाट टळली असती. सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी आधीच चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा होता.”
पुढे बोलताना भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोनम वांगचुक यांच्या २६ दिवसांच्या उपोषणाचाही उल्लेख केला. “सध्या देशात घडणाऱ्या अशा घटनांमुळे जनतेच्या मनात तीव्र असंतोष आहे. आता सरकारने सर्वांशी संवाद साधून हा संताप शांत करण्याचे काम केले पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.






