Devendra Fadnavis: दिल्लीच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान; एकाच वाक्यात स्पष्ट केली भूमिका
Devendra Fadnavis: दिल्लीला रवानगी होण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं

Devendra Fadnavis : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं. वाढत्या राजकीय दबावाच्या आणि देशव्यापी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाच्या समर्थनार्थ २५ दिवस उपोषण केले. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता.
मात्र दिल्लीत झालेल्या या घडामोडींनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी काल दिल्लीला रवाना झाले. देवेंद्र फडणवीकेलेल्या एका दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकते, असा दावा केला. त्यामुळे फडणविसांची केंद्रात वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला. परंतु त्यानंतर काल संध्याकाळी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आले.
यानंतर आज दिल्ली दौरा आणि दिल्लीला रवानगी होण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. “मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच राहणार आहे,” असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. यावरून दिल्लीला जाण्याच्या चर्चांना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.
Sanjay Raut : मोदींची जागा शाह घेणार? राऊतांचा सर्वात मोठा दावा; म्हणाले “त्यासाठी हे सगळं…” ठाकरे बंधूंना टोला
तर ठाकरे बंधूंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रेशनवरही फडणवीस यांनी भाष्य केले. “विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ठाकरे बंधूंना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण मिळालं, याचा मला आनंद आहे.” तर ठाकरेंच्या टीकेवरती उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग हे गेल्या दहा वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉगचा कोणावरही असर होत नाही, संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे. रात्री एक वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो, याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी आहे,” असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
मोदीजींचे मानले आभार
पुढे फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदनशीलता दाखवून देशाच्या हिताचे सर्व आवश्यक निर्णय घेतले आहेत. तरुणांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी लोकसभेत एक असा कठोर कायदा आणला जात आहे, जो देश आणि जगाच्या इतिहासात कुठेही झालेला नाही. असा कायदा करण्याचा जो काही निर्णय घेतला आहे. यासाठी मी मोदीजींचे आभार मानतो.”
हेही वाचा:
Malaika Arora: “कोण आहे हे लोक?” मलायका अरोरा भोजपुरी सुपरस्टारवर संतापली






