Gunaratna Sadavarte : मोठी बातमी..! गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसैनिकांचा हल्ला; शाईफेकनंतर सुपाऱ्याही फेकल्या
Gunaratna Sadavarte : जालन्यातील विशाल कॉर्नर भागात गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक आणि सुपारी फेकून हल्ला केल्याची घटना जालन्यात घडली आहे. शहरातील विशाल कॉर्नर परिसरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, ज्या गाडीवर हल्ला झाला त्या वाहनात सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. (Gunaratna Sadavarte)
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे आणि काही पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षाचालकांच्या मराठी-अमराठी वादावरून सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. (Gunaratna Sadavarte)
त्यानंतर मनसैनिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. घटनेनंतर चंदनझिरा पोलीस यांनी तातडीने कारवाई करत मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. (Gunaratna Sadavarte)
काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षाचालकांच्या संदर्भात ‘मराठी विरुद्ध अमराठी’ असा वाद निर्माण झाला होता. या वादावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या विधानामुळे मनसैनिक आक्रमक झाले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Gunaratna Sadavarte)
शहरात तणावाचे वातावरण (Gunaratna Sadavarte)

Gunaratna Sadavarte : मोठी बातमी..! गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसैनिकांचा हल्ला; शाईफेकनंतर सुपाऱ्याही फेकल्या
भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे जालना शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. (Gunaratna Sadavarte)





