BJP Leader : माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; भाजपवर कोसळला दुःखाचा डोंगर
BJP Leader : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भुवन चंद्र खंडुरी यांचे देहरादून येथे निधन झाले.

BJP Leader : भुवन चंद्र खंडुरी यांचे सोमवारी निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि देहरादून येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. (BJP Leader)
खंडुरी यांच्या कन्या आणि उत्तराखंड विधानसभा अध्यक्षा रितू खंडुरी भूषण यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये त्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. (BJP Leader)
मुख्यमंत्री धामींकडून श्रद्धांजली (BJP Leader)

BJP Leader : माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; भाजपवर कोसळला दुःखाचा डोंगर
पुष्कर सिंह धामी यांनी खंडुरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. “भुवन चंद्र खंडुरी यांनी सैन्यात सेवा बजावताना राष्ट्रसेवा, शिस्त आणि समर्पणाचा आदर्श घालून दिला. त्यांचं संपूर्ण आयुष्य राष्ट्रहित आणि लोकसेवेसाठी समर्पित होतं,” असं धामी म्हणाले. तसेच त्यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणाची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. (BJP Leader)
दोन वेळा भूषवलं मुख्यमंत्रीपद
भुवन चंद्र खंडुरी यांनी भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला. ते 2007 मध्ये प्रथमच उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले होते. 2007 ते 2009 या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. (BJP Leader)
2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर सप्टेंबर 2011 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि 2012 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं होतं. (BJP Leader)
हेही वाचा
BJP Leader Passes Away : भाजपवर दु:खाचा डोंगर! राज्यमंत्र्याचे निधन, राजकीय वर्तुळात हळहळ





