BJP Leader Passes Away : भरत माटियारा यांचे उपचारादरम्यान निधन झाले असून भाजपसह संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राज्यमंत्री दर्जाचे आणि मच्छीमार कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले भरत माटियारा हे मागील काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर सुरुवातीला रायपूर येथे उपचार सुरू होते. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. (BJP Leader Passes Away) भरत माटियारा यांच्या निधनाची बातमी समोर येताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांच्या कार्याची आठवण काढली आहे. दोनवेळा भाजप जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी भरत माटियारा यांनी भाजप संघटनेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ते दोन वेळा भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले होते. त्यानंतर त्यांची मच्छीमार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती, ज्याला राज्यमंत्री दर्जा देण्यात आला होता. (BJP Leader Passes Away) तळागाळातील कार्यकर्त्यांशी कायम संपर्क ठेवणारे आणि ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्यासाठी सक्रिय असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. विशेषतः मच्छीमार समाजात त्यांचा मोठा प्रभाव मानला जात होता. (BJP Leader Passes Away) शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार माटियारा यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे भाजपने एक अनुभवी आणि संघटन मजबूत करणारा नेता गमावल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. (BJP Leader Passes Away) हेही वाचा BJP Leader Death : भाजपच्या दिग्गज नेत्याचं अपघाती निधन; मंत्री, खासदार, आमदारांचे तातडीने सर्व दौरे रद्द