Rohit Patil : ‘नीट’ पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. पेपर लीक झाला म्हणून कोणावर तरी कारवाई करायचं काम केंद्र सरकार करत असेल तर ते चुकीचं आहे, केंद्र सरकारने या विषयाची गंभीर दखल घेऊन जबाबदारी घेतली पाहिजे, इतक्या संवेदनशील विषयावर आणि कोट्यवधी लोकांचे कुटुंब उध्वस्त होणार असेल तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजे, अशी मागणी (Rohit Patil) त्यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादी काग्रेस एकत्र येण्यासंदर्भात जोपर्यंत शरद पवार यांच्यासोबत चर्चा होत नाही, तोपर्यंत यावर वक्तव्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी अत्यंत विश्वासाने मला मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी सांगितलं इथे सही कर, तर त्या ठिकाणी सही करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते जो निर्णय सांगतील तो मला मान्य असेल, असेही त्यांनी (Rohit Patil) नमूद केले. Rohit Patil पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी टांग्यातून प्रवास करून सांगलीत इंधन बचत परिषद घेतली होती. याबाबत आमदार रोहित पाटील म्हणाले, ‘‘थोडं फार इकॉनॉमिक्स आम्हालाही कळत. आणि त्या इकॉनॉमिक्स अँगलने ज्यावेळेस आम्ही बघतो तर देश येणाऱ्या काळात प्रचंड अडचणीत जाणार आहे. आता कोण कसे येते, कोण कसे जाते. सुदैवाने- दुर्दैवाने सुरुवातीपासूनच आम्ही एका गाडीतून फिरतोय. त्यामुळे एका गाडीची तर काही अडचण नाही असे वाटते. ना आम्हाला ताफा कमी करावा लागला, ना वाढवावा लागला. त्यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळची गाडी सुरळीत चाललेली आहे.’’