Abhijeet Dipke : आंदोलनाच्या यशस्वी लढ्यानंतर अभिजीत दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ; समर्थकांसह टीकाकारांचेही मानले आभार
Abhijeet Dipke : केंद्रीय शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवला

Abhijeet Dipke : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेवरील तीव्र टीकेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
नीट पेपरफुटीनंतर दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या ३६ दिवसांपासून जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला आहे. त्यानंतर विद्यार्थांकडून देशभरात मोठा जल्लोष साजरा केला जाऊ लागला. दरम्यान, केंद्र सरकारने सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक व्हीडिओ शेअर करत देशभरातील समर्थकांचे मनःपूर्वक आभार मानले.
अनेक दिवसांच्या आंदोलनामुळे दीपके यांची प्रकृती खालावली असून त्यांना टायफॉईड आणि ताप असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी परतावे लागले. जंतरमंतरवर आपली वाट पाहणाऱ्या समर्थकांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष भेट घेता आली नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
अभिजीत दीपकेंनी मानले आभार
देशभरातून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दीपके म्हणाले, “गेले ३७ दिवस अत्यंत संघर्षाचे आणि कठीण होते. आता कुठे मला शांत झोप लागेल. जेव्हा सगळे आमच्यावर शंका घेत होते, तेव्हा तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलात आणि प्रेम दिले. तुमच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे यश मिळवणे अशक्य होते. ३७ दिवस जंतरमंतरवर ऊन- पावसाची तमा न बाळगता ठामपणे उभे राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि समर्थकाला माझा मनःपूर्वक सलाम.”
View this post on Instagram
तसेच दीपके यांनी टीकाकारांचेही आभार मानले. “ज्यांनी आमच्या गांभीर्यावर प्रश्न उपस्थित केले किंवा आम्हाला आंदोलनाची पद्धत कळत नाही अशी टीका केली, त्यांचेही मी आभार मानतो. त्यांनी घेतलेल्या अक्षेपामुळेच आम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करता आली,” असे दीपके यांनी म्हटले आहे. तसेच ही तर फक्त सुरुवात असून अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, असा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.
सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांनंतर उपोषण मागे
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द केला होता. या घडामोडीनंतर केंद्रीय शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला. याशिवाय विद्यार्थांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवस उपोषण केले होते. परंतु सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
Free Healthcare : आषाढी वारीत ७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा






