Karishma Tanna: करिश्मा तन्नाचे मॅटर्निटी फोटोशूट; शेअर केले खास फोटो
Karishma Tanna: काही फोटोंमध्ये ती पती वरुण बंगेरासोबत पोज देताना दिसली, तर काही फोटोंमध्ये कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले आहेत.

Karishma Tanna: अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच आई होणार आहे. करिश्माने ६ एप्रिल २०२६ रोजी सोशल मीडियावर पती वरुण बंगेरासोबत फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. करिश्मा तन्ना हे सुंदर क्षण आठवणींच्या स्वरूपात जपून ठेवत आहे. ती अनेकदा या सुंदर प्रवासाची झलक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आता तिने मॅटर्निटी फोटोशूट तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. मॅटर्निटी शूटच्या या फोटोंमध्ये ती बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती पती वरुण बंगेरासोबत पोज देताना दिसली, तर काही फोटोंमध्ये कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले आहेत.
View this post on Instagram
नुकताच तिने शेअर केलेला हा नवीन मॅटर्निटी फोटोशूट लोकांना खूप आवडला आहे. फोटोंमध्ये करिश्मा अत्यंत साध्या, सुंदर आणि एलिगंट लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीची डिलिव्हरी पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये होणार आहे. अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनीही तिच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत कमेंट्स केल्या आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
करिश्मा आणि व्यावसायिक वरुण बंगेरा यांचा विवाह ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडला होता. या दोघांची पहिली भेट २०१८ मध्ये झाली होती आणि त्यानंतर वरुणने तिला दुबईमध्ये प्रपोज केले होते. आता लग्नाच्या चार वर्षानंतर हे जोडपे आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.





