Uddhav Thackeray : एका झुरळाने हुकमूशहाला नमवलं हा खरा विष्णूचा अवतार : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : या मार्चमधून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

Uddhav Thackeray strongly criticizes the Central Government during the Tricolour March : काल सर्वात मोठी घडामोड घडली. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यांनी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. हे कॅाक्रोच जनता पार्टीच्या लढ्याचे सर्वात मोठं यश मानलं जात आहे. या पार्टीचे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दिपके यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दर्शवला होता.
महाराष्ट्रातून ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या आदोंलनाच्या लढ्याला यश आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे तिंरगा मार्चचे आयोजन केले होते. या मार्चमधून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष : उद्धव ठाकरे
“देशातल्या देशभक्तांना अभिवादन करत आहे. कोणती निवडणूक कोणी जिंकलेलं नाही. अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. संघर्षाची सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष आहे. या संघर्षात आपण सर्व जण जात, पात, धर्म विसरुन होय मी भीरतीय, देशभक्त आहे या एकाच भावनेने सहभागी झाले आहेत. काल एका झुरळाने हुकमूशहाला नमवलं हा खरा विष्णूचा अवतार आहे.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकेचे बाण सोडले.
त्यापेक्षा जास्त यातना….
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदीजींना मला सांगायचं आहे, तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना तुम्हाला जितक्या यातना झाल्या, त्यापेक्षा जास्त यातना आपण आता ज्यांना श्रद्धांजली वाहिली, त्या मुलांनी जीवन संपवलं, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना झाल्या.” “मोदीजी आता तरी देशाकडे लक्ष द्या. ते तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना म्हणाव आता देशाचं काम करा.” असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
तरुणांच्या हातात तिरंगा
धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याचं सेलिब्रेश करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधुंनी जल्लोष सभा आयोजित केली आहे. या मोर्चात मुंबईतील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला साद देत तरुणांच्या हातात तिरंगा दिसला. शिवाजी पार्क तरुणांच्या घोषणांनी दणाणून निघाला.






