Toll Waiver News : मोठी बातमी..! महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावर सर्व वाहनांना टोलमाफी; सरकारचा मोठा निर्णय
Toll Waiver News : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना आणि गणेशभक्तांना राज्य सरकारने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे.

Toll Waiver News : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या खासगी वाहनांना आणि एसटी बसना पथकरातून पूर्ण माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई-बंगळुरू मार्गावरून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. (Toll Waiver News)
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत माहिती दिली. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा, तसेच गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (Toll Waiver News)
११ ते २७ सप्टेंबरपर्यंत टोलमाफी
सरकारच्या निर्णयानुसार ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. या टोलमाफीमध्ये मुंबई-गोवा महामार्ग (NH-66), मुंबई-बंगळुरू महामार्ग (NH-48), अटल सेतू (MTHL), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अखत्यारीतील संबंधित मार्ग या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई आणि इतर भागांतून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. (Toll Waiver News)
टोलमाफीसाठी पास किंवा स्टिकर आवश्यक
टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी संबंधित वाहनावर ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ असा विशेष पास किंवा स्टिकर लावणे आवश्यक असणार आहे. या पासवर वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. (Toll Waiver News)
गणेशभक्तांना हा पास जवळच्या पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौकी आणि RTO कार्यालयातून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, परतीच्या प्रवासासाठीही हाच पास ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे कोकणातून परतताना पुन्हा स्वतंत्र पास घेण्याची गरज भासणार नाही. (Toll Waiver News)
एसटी बसनाही टोलमाफी
कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसनाही टोलमधून पूर्ण सवलत देण्यात आली आहे. एसटी बससाठी पोलीस आणि RTO यांच्या समन्वयातून विशेष पासची व्यवस्था करण्यात येणार आहे. (Toll Waiver News)

गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढते. त्यामुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ यांच्यात समन्वय साधून विशेष नियोजन केले जात आहे. (Toll Waiver News)
एकूणच, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफीमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात येत आहे. (Toll Waiver News)
Highway Toll Rules : मोठी बातमी..! महामार्गावरील टोल नियमात बदल; सरकारचा नवा प्लॅन काय?





