Highway Toll Rules : मोठी बातमी..! महामार्गावरील टोल नियमात बदल; सरकारचा नवा प्लॅन काय?
Highway Toll Rules : राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनधारकांना केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे.

Highway Toll Rules : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकार महामार्गांवरील टोल व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत असून, यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः कमी अंतराच्या प्रवासात वारंवार टोल भरावा लागत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरकारने टोल व्यवस्थेबाबत कडक नियम लागू करण्यावर भर दिला आहे. (Highway Toll Rules)
60 किलोमीटर अंतराचा नियम
राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार, एकाच राष्ट्रीय महामार्गावर आणि एकाच दिशेत दोन टोल प्लाझांमध्ये साधारण 60 किलोमीटरचे अंतर असणे आवश्यक आहे. मात्र, पूल, बोगदे, बायपास किंवा इतर विशेष परिस्थितीत सरकारला अपवाद करण्याचा अधिकार आहे. अलीकडेच केंद्राने या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला असून, 60 किमीपेक्षा कमी अंतरावर नवीन टोल प्लाझांना मंजुरी देताना विशेष कारणे नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Highway Toll Rules)
वाहनचालकांना होणार मोठा फायदा
यापूर्वी अनेक ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर अंतरावरच टोल प्लाझा असल्याने वाहनचालकांना अल्प अंतरातही अनेकदा टोल भरावा लागत होता. नव्या धोरणामुळे अशा तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच टोल प्लाझांची योग्य रचना झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास अधिक सुलभ होईल. (Highway Toll Rules)
GPS आधारित टोल प्रणालीवर सरकारचा भर
केंद्र सरकार GNSS (GPS आधारित) टोल प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्याच्या दिशेनेही काम करत आहे. ही प्रणाली पूर्णपणे लागू झाल्यानंतर वाहनचालकांनी प्रत्यक्ष महामार्गावर जितके अंतर प्रवास केले, त्यानुसारच टोल आकारला जाईल. यामुळे टोल वसुली अधिक पारदर्शक होण्याबरोबरच टोल प्लाझांवरील गर्दीही कमी होण्याची शक्यता आहे. (Highway Toll Rules)






