Tilak Jamie Fight : तिलक वर्मा आणि जेमी ओवर्टनमध्ये भर मैदानात राडा; सूर्यकुमारला करावी लागली मध्यस्थी, पाहा नेमकं काय घडलं?
Tilak Jamie Fight : तिलक-जेमिचा वाद इतका विकोपाला गेला की, पंचांना आणि नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या सूर्यकुमार यादवला धावून येऊन मध्यस्थी करावी लागली.

Tilak Varma Jamie Overton Fight IPL 2026 : आयपीएल २०२६ मधील मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील लढत केवळ धावांच्या फरकामुळेच नाही, तर मैदानावरील खेळाडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळेही चर्चेत आली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईचा फलंदाज तिलक वर्मा आणि चेन्नईचा गोलंदाज जेमी ओवर्टन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
कधी झाला वाद?
चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या २०८ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट झाली होती. मात्र, १० व्या षटकात मैदानावर वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. गेल्या सामन्यातील शतकवीर तिलक वर्मा आणि चेन्नईचा वेगवान गोलंदाज जेमी ओवर्टन यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पंचांना आणि नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या सूर्यकुमार यादवला धावून येऊन मध्यस्थी करावी लागली.
HERE IS THE VIDEO OF FIGHT BETWEEN TILAK VARMA AND JAMIE OVERTON.#MIvsCSK #CSKvsMI #IPL2026 #TATAIPL #ElClasico #IPLMatchDay #MumbaiIndians #MI #ChennaiSuperKings #CSK #WhistlePodu #Yellove #CSKFans #RohitSharma #HardikPandya #JaspritBumrah #MSDhoni #RuturajGaikwad… pic.twitter.com/iu8aPwcapr
— Infinite Info (@infiniteInfos) April 23, 2026
वादाचे नेमके कारण काय?
दहाव्या षटकात जेमी ओवर्टन गोलंदाजीसाठी आला असता, तिलक वर्माने त्याला पहिल्या दोन चेंडूंवर दोन खणखणीत चौकार लगावले. त्यानंतर षटकातील एका चेंडूवर धाव घेताना दोघांमध्ये खुन्नस पाहायला मिळाली. असे मानले जात आहे की, जेमी धावत येत असताना (Run-up) तिलक वर्माने आपण तयार नसल्याचे सांगत त्याला मध्येच थांबवले होते. वारंवार होणाऱ्या या अडथळ्यामुळे जेमीचा संयम सुटला आणि षटक संपल्यानंतर दोघांनीही एकमेकांवर आगपाखड केली.
मुंबईची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली –
🚨FIGHT BETWEEN TILAK VARMA AND JAMIE OVERTON🚨
Tilak called for 2 runs.
Jamie: Why didn’t you run 2?
Tilak: Can’t you see the fielder?
Jamie: “He was far behind”
Tilak: “He was already halfway”
Jamie: “Don’t argue”
Tilak: “Go from here”#MIvsCSK pic.twitter.com/Bzsv5oLo1x
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) April 24, 2026
या वादाचा परिणाम तिलकच्या एकाग्रतेवर झाला की काय, असे वाटत असतानाच तो ३७ धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे, या सामन्यात मुंबईच्या एकाही फलंदाजाला चेन्नईच्या अचूक गोलंदाजीपुढे तग धरता आला नाही. केवळ तिलक वर्मा (३७) आणि सूर्यकुमार यादव (३६) या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरल्याने मुंबईला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर दोघे एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसली. मात्र, आता या गैरवर्तणुकीबद्दल बीसीसीआय या दोघांना काय शिक्षा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





