INDIA Alliance : देशाच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप; ‘हा’ सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीत सामील
INDIA Alliance :

INDIA Alliance : तमिळनाडूत इंडिया आघाडीची बैठक झाली. विशेष म्हणजे, त्या बैठकीत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले. संबंधित घडामोडीकडे राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या आघाडीतील टीव्हीकेची औपचारिक एन्ट्री म्हणून पाहिले जात आहे. (INDIA Alliance)
तमिळनाडूत टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता आहे. त्या आघाडीला राज्यात वेगळे नाव देण्यात आले आहे. राज्यातील आघाडीचे घटक असणारे कॉंग्रेससह बहुतांश पक्ष इंडिया आघाडीचे सदस्य आहेत. मात्र, आतापर्यंत टीव्हीकेने राष्ट्रीय स्तरावरील आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. (INDIA Alliance)
त्यामुळे तमिळनाडूत इंडिया आघाडीच्या बॅनरखाली झालेल्या बैठकीतील टीव्हीकेचा सहभाग लक्षणीय ठरला. त्या घडामोडीचा उल्लेख कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मणिक्कम टागोर यांनी ऐतिहासिक दिवस अशा शब्दांत केला. (INDIA Alliance)
तमिळनाडूतील बैठक प्रामुख्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील निदर्शनांची रूपरेषा ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होणाऱ्या निदर्शनांमध्ये टीव्हीकेही सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले. (INDIA Alliance)
कॉंग्रेसने तमिळनाडूत द्रमुकची साथ सोडत टीव्हीकेशी हातमिळवणी केली. त्यामुळे नाराज झालेला द्रमुक इंडिया आघाडीतून बाहेर पडला. आता त्या पक्षाची जागा टीव्हीकेने घेतल्याचे सूचित होत आहे. (INDIA Alliance)
Political News : महायुतीचं टेन्शन वाढलं ! निवडणुकीपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत बंड






