हा तर ‘इंडिया’चा धसका..! सिलिंडरचे दर कमी केल्यानंतर ममता बॅनर्जींची सरकारवर टिका
Updated On:

नवी दिल्ली – घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर त्यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीचा धसका घेतल्याने केंद्राने गॅसच्या किमती कमी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. “विरोधी गटाच्या केवळ दोन बैठका आणि गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी…’ असे ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांची ही पोस्ट आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेअर केली आहे.





