नवी दिल्ली – कोळसा मंत्रालयाने,स्वच्छ पर्यावरणाच्या दृष्टीने रेल्वेने कोळशाची वाहतुक करण्याच्या कार्याला गती दिली आहे आणि देशात कोळशाची रस्त्यावरील वाहतुक हळूहळू कमी करण्यासाठी प्रथमतः प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रीनफिल्ड कोळसा असलेल्या भागात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन्सचे नियोजित बांधकाम, नवीन लोडिंग पॉईंट्सपर्यंत रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करणे आणि काही ठिकाणी रेल्वे मार्ग दुहेरी आणि तिहेरी करणे यामुळे रेल्वेने कोळशाची वाहतूक करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.
विविध मंत्रालयांना एकत्र आणत तसेच पायाभूत सुविधा जोडणी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजनासाठी आणि समन्वित अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2021 मध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी गती शक्ती-या योजनेचा राष्ट्रव्यापी मुख्य आराखडा तयार केला आहे.
यामध्ये विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या पायाभूत सुविधा योजनांचा समावेश केला जाईल त्याचप्रमाणे स्थानिक नियोजन साधनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा लाभही घेतला जाईल.