जगातील बहुतांश देशांमध्ये दारूचे सेवन केले जाते. दारू पिणे आरोग्यास हानीकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु असे असूनही लोक दारूचे सेवन करताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही देशांमध्ये दारू पिण्याची विचित्र परंपरा आहे. म्हणजे दारू पिण्याच्या अतिशय विचित्र पद्धती आहेत. काही देशांमध्ये चीअर करणे हा गुन्हा आहे, तर काही देशांमध्ये लोक ग्लासऐवजी चक्क शूजमध्ये घालून दारू पितात. आज आम्ही तुम्हाला त्या देशांबद्दल सांगत आहोत, जिथे दारू पिण्याची विचित्र परंपरा आहे. चला तर, जाणून घेऊया.
‘इथे’ वाईनशिवाय लग्न लागत नाही !
भारतासह जगातील विविध देशांच्या लग्नाबाबत आपापल्या पद्धती आहेत. असा क्वचितच एखादा देश असेल, जिथे दारूशिवाय लग्न होत नाही. नायजेरियात लग्नाच्या वेळी वधूला तिच्या वडिलांकडून वाइनचा ग्लास दिला जातो. यानंतर मुलगी लग्नातील पाहुण्यांसमोर ग्लास तिच्या पतीला देते. जेव्हा मुलगी तिचा ग्लास नवऱ्याला देते तेव्हा ते लग्न लागले असे मानले जाते. लग्नात मुलीच्या बाजूने वाइन आणली नाही तर लग्न पूर्ण मानले जात नाही.
‘या’ देशात चिअर्स बोलण्यावर बंदी !
जेव्हा लोक पार्टीत किंवा कोठेतरी एकत्र दारूचे सेवन करतात तेव्हा ते चीअर्स बोलून याची सुरुवात करतात. मात्र, हंगेरीमध्ये असा जल्लोष करणे हा गुन्हा मानला जातो. हंगेरीमध्ये दारू पिण्याआधी ‘चिअर्स’ म्हणणे हा वाईट प्रकार मानला जातो. यामागे एक खास कारण आहे. वास्तविक, 1849 मध्ये ऑस्ट्रेलियन सैनिकांनी काही हंगेरियन क्रांतिकारकांना ठार मारले, त्यानंतर ऑस्ट्रेलियन लष्करी अधिकाऱ्यांनी ग्लासची टक्कर करत ‘चिअर्स’ हा शब्द वापरला. तेव्हापासून येथील स्थानिक लोक याला चांगले मानत नाहीत.
‘इथे’ लोक शूजमध्ये घालून दारू पितात
लग्नात जोडे चोरण्याचा विधी भारतात खूप प्रसिद्ध आहे. या विधीमध्ये, वराने जोडा चोरलेल्या व्यक्तीला काही पैसे दिल्यानंतर तो जोडा परत करतो. युक्रेनमध्येही थोडीफार अशीच प्रथा आहे. इथेही लग्नादरम्यान वधूचा जोडा किंवा शूज चोरी केले जातात. यानंतर शूज चोरणाऱ्या व्यक्तीने लग्नात आलेल्या लोकांना वधूच्या शूजमध्ये दारू घालू ते पिण्यास सांगतात. ऑस्ट्रेलियातही आनंदाच्या निमित्ताने लोक शूजमध्ये घालून दारू पितात.