IPL 2025 Retention List – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आधीच आय़पीएल 2025 च्या तयारीत व्यस्त आहे. बोर्डाने सर्व 10 फ्रँचायझींना त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले आहे. यासाठी बीसीसीआयने 31 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत, सर्व फ्रँचायझी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बोर्डाकडे सादर करतील. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादी संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करायची आहे. 31 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवशीच क्रिकेट चाहत्यांना कोणत्या संघाने कोणता खेळाडू कायम ठेवला आहे आणि कोणाला वगळले आहे हे कळणार आहे. IND vs NZ 2nd Test : मालिका गमावल्यानंतर प्रशिक्षक गंभीर ॲक्शन मोडवर, तिसऱ्या कसोटीपूर्वी खेळाडूंना दिला सक्तीचा आदेश… यासाठी एक खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. ज्यातून 2025 साठी संघात कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण माहिती जिओ सिनेमावर दिली जाईल. यासाठी एक विशेष कार्यक्रम 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.30 वाजल्यापासून जिओ सिनेमावर सादर केला जाणार असून त्याद्वारे रिटेन, रिलीज खेळाडूंची माहिती चाहत्यांना मिळणार आहे.