टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; बाळाची पहिली झलक दाखवत व्यक्त केल्या भावना

TV Actress Kunjika Kalwint | अभिनेत्री कुंजिका काळविंट स्टार प्रवाहवरील ‘शुभ विवाह’ मालिकेतून घराघरात पोहचली. यात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. मात्र बाळंतपणासाठी अभिनेत्रीनं या मालिकेतून ब्रेक घेतला होता. महिन्याभरापूर्वी आई झाल्यानंतर आता तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत तिनं बाळाची झलक सोशल मीडियात शेअर केली आहे. तिनं या पोस्टवर खास कॅप्शन शेअर केलं आहे.
“अगदी महिन्याभरापूर्वी आमचं बाळ या जगात आलं. बाळाचे आगमन होताच आमचे ह्रदय इतके भरून आले की, ज्याची आम्हाला कल्पनाही नव्हती. गेले 4 आठवडे निद्राहीन रात्र, बाळाला शांतपणे खुशीत घेण्याचे क्षण, हे सगळं आमच्यासाठी प्रेमाने भरलेले होते. पालकत्व आपल्यात नम्रपणा आणते. आम्ही सध्या शिकतोय, वाढत आहोत. तसेच आमच्या चिमुकल्याच्या जास्त प्रेमात पडत आहोत. आमच्या नव्या अध्यायाबद्दल, कुटुंबाला दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत”, असं अभिनेत्रीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. TV Actress Kunjika Kalwint |
View this post on Instagram
या पोस्टवर मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कुंजिका काळविंटच्या पोस्टवर सुबोध भावे, ऋतुजा धाराप, नक्षत्र मेढेकर, शर्वरी जोग, ऋतुजा बागवे, केतकी विलास यांसारख्या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कुंजिकाला ‘स्वामिनी’ या मालिकेतून ओळख मिळाली. तसेच ती ‘परत आलीय’ या हॉरर मालिकेतही दिसली होती. TV Actress Kunjika Kalwint |
हेही वाचा:
“मादुरो यांच्यासारखे नेत्यानाहू यांचेही अपहरण करा”; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची अजब मागणी





