Keerthy Suresh: किर्ती सुरेशला दिग्दर्शकाकडून चुकीचा स्पर्श? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर
Keerthy Suresh : दिग्दर्शक मिस्किन यांच्या वागण्यावर नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित

Keerthy Suresh: अभिनेत्री किर्ती सुरेश ‘सत्यवान सावित्री’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये दिग्दर्शक मिस्किन देखील तिच्यासोबत अभिनय करताना दिसणार आहेत. नुकतीच चेन्नईमध्ये या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यात दिग्दर्शक आणि अभिनेता मिस्किन यांनी कीर्तीला चुकीचा स्पर्श केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी मिस्किन यांच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले.
या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक मिस्किन किर्तीला उद्देशून बोलत असताना तिच्या गुडघ्यांना स्पर्श करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक सोशल मीडिया युजर्सनी याचा चुकीचा अर्थ काढला आणि ‘बॅड टच’ म्हणत मिस्किन यांच्यावर टीका केली. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर आता कीर्तीने प्रतिक्रिया दिली आहे.
किर्ती सुरेश काय म्हणाली?
किर्ती सुरेशने एक पोस्ट शेअर करत स्पष्ट केले आहे की, आमच्यात वडील आणि मुलीचे नातं आहे. किर्ती म्हणाली, “सगळ्यात आधी तर मला हे जाणून घ्यायचं आहे की माझ्या चेहऱ्यावर अस्वस्थता कुठे दिसत आहे? आम्ही दोघे एकमेकांना वडील-मुलीच्या नात्याप्रमाणे मानतो, हे तुम्ही ऐकलं नाही का?
आम्हाला चित्रपटांमध्येही असा स्पर्श केला जातो, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असं झालं तरी आम्हाला काहीच अस्वस्थ वाटणार नाही, असंही लोक बोलत आहोत. पण असं काही नाही. तुम्हा सर्वांना गोष्टी योग्य प्रकारे समजून घेण्याची गरज आहे.”
कीर्तीच्या या उत्तरानंतर संबंधित नेटकऱ्याने आपली पोस्ट डिलीट केली आणि अभिनेत्रीची माफीही मागितली. आपला कोणताही वाईट हेतू नव्हता, व्हिडीओ व्हायरल होत असल्याने आपण ती पोस्ट केल्याचं त्याने स्पष्ट केलं.
किर्ती सुरेशचं वर्कफ्रंट
किर्ती सुरेश ‘सत्यवान सावित्री’मध्ये वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाला. याशिवाय ती ‘कन्निवेडी’, ‘थोट्टम’, ‘राउडी जनार्दन’, ‘रफ्तार’ आणि ‘जानेवारी १२ विडुडाला’ यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.
हेही वाचा:
Winter Travel: हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? उत्तर भारतातील ‘या’ ७ ठिकाणांना नक्की द्या भेट!





