Krantijyoti Marathi Medium School Film : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॅाक्स अॅाफिसवर चांगली कामगिरी केली असून, तब्बल ३ .९ १ कोटी रुपये कमावले आहेत. ही मराठी चित्रपटासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. अजूनही प्रेक्षकांकडून उत्तम प्रदिसाद चित्रपटाला मिळताना दिसत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील फार कमी चित्रपट आहे की ते बॅाक्स अॅाफिसवर हिट ठरतात आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. त्यापैकी एक म्हणजे ‘क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम‘ हा चित्रपट आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिट ठरल्याने या वर्षांत मराठी चित्रपटांना चांगले यश मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल 78 लाखांची कमाई केली आहे. शनिवारी आणि रविवारच्या सुट्ट्यांच्या कालावधीत चित्रपटाला मोठा फायदा झाला आहे. ‘क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम‘ चित्रपटाची कथा प्रत्येकाच्या मनाला भावणारी आहे. कमी होत चाललेल्या मराठी शाळा हा विषय चित्रपटातून समोर येतो आणि विचार करायला भाग पाडतो. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, अनंत जोग, प्राजक्ता कोळी आणि निर्मिती सावंत या कलाकारांनी विविध भूमिका साकारलेल्या आहेत. चित्रपटाची कथा रायगड जिल्ह्यातील एका मराठी शाळेला वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या काही माजी विद्यार्थ्यांचा एकजुटीची आणि संघर्षाची आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांचे मन त्यांच्या शाळेतील आठवणींत रमून जाते. सोशल मीडियावर देखील चित्रपटाचे भरभरून कौतुक करणाऱ्या पोस्ट लिहिल्या जात आहेत. २०२५ मध्ये ‘दशावतार‘ या चित्रपटाने इतिहास रचला. आता तर या चित्रपटाची ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झाली असून, ऑस्करच्या शर्यतीत सामील होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे मराठी चित्रपट पुन्हा एकदा उभारी घेताना दिसत आहे. हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या आधी मिळणार आठवा वेतन आयोग ? ; वाचा सविस्तर माहिती