नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहे, या दौऱ्यादरम्यान तेअनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी राहुल गांधींची वेगळी शैली शनिवारी पाहायला मिळाली. राहुल गांधी यांनी लेह शहरापासून पैंगोंग तलावापर्यंत बाईक चालवली. आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेतला.
View this post on Instagram
राहुल गांधींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर बाईक चालवतानाचे काही फोटो शेअर केले आहे. यादरम्यान ते वेगळ्या अंदाजात दिसले. फोटोंना कॅप्शन देत राहुल यांनी लिहिले की,’मी पॅंगॉन्ग लेककडे जात आहे. माझे वडील म्हणायचे की, हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. यादरम्यान राहुल गांधी लेह, लडाख आणि पैंगोंगचे हॅशटॅगही वापरले.
राहुल गांधी अनेकदा पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेले दिसतात, पण बाईक राइड दरम्यान ते निळ्या रंगाचे जाकीट आणि स्पोर्ट्स ट्राउझर घातलेले दिसताय. याशिवाय त्यांनी हेल्मेटही घातले आहे. राहुलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राहुल गांधींनी एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे की, त्यांना बाइक चालवायला आवडते. ते नेहमी कडक सुरक्षेखाली असतत्, त्यामुळे बाईक राईड करू शकत नाही. 18 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी लेहमध्ये फुटबॉलचा सामनाही पाहिला आणि तेथील लोकांशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचवेळी राहुल यांनी लडाखमधील फुटीरतावादाच्या मुद्द्यावर युवक काँग्रेसच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. राहुल गांधी म्हणाले की, काही राजकीय लोक देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत.
20 ऑगस्ट रोजी, आज राहुल गांधी त्यांचे दिवंगत वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पॅंगोंग तलावावर श्रद्धांजली अर्पण करतील. नंतर ते कारगिललाही जातील आणि तेथे सभा घेणार आहे. काँग्रेस नेते 17 ऑगस्ट रोजी लेह येथे पोहोचले, तेथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राहुल गांधी २५ ऑगस्टपर्यंत लडाखमध्ये राहणार आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दोनदा श्रीनगर आणि जम्मूला भेट दिली होती, मात्र ते लडाखला गेले नव्हते.