Khawaja Asif on Benjamin Netanyahu | पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. नेत्यानाहू हे मानवतेचे सर्वात मोठे शत्रू असून त्यांचे अमेरिकेने अपहरण करावे, अशी मागणी ख्वाजा आसिफ यांनी केली आहे. एका टिव्ही मुलाखतीत ख्वाजा आसिफ इस्रायलने गाझामध्ये केलेल्या हल्ल्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “अमेरिका खरोखरच मानवतेसाठी लढत असतेल तर त्यांनी मानवतेचे सर्वात मोठे शत्रू नेत्यानाहू यांचे अपहरण करावे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करून त्यांना अमेरिकेच्या न्यायालयात हजर करण्यात आले, त्याप्रमाणेच नेत्यानाहू यांचे अपहरण करून त्यांना एखाद्या न्यायालयात सादर करून त्यांच्याविरुद्ध खटला सुरू करावा,” अशी मागणी आसिफ यांनी केली. पुढे ते म्हणाले, “इस्रायलचे पंतप्रधान मानवतेचे सर्वात मोठे गुन्हेगार आहेत. त्यांना जगातील सर्वात मोठे गुन्हेगार म्हणून घोषित केले पाहिजे. गेल्या ५ हजार वर्षांत जगाने इतका मोठा गुन्हेगार पाहिला नाही. पाकिस्तानची जनता सध्या बेंजामिन नेतन्याहूंच्या अपहरणासाठी प्रार्थना करत आहे. तुर्कीसारखे देशही हे काम करू शकतात.” इस्रायलचे प्रत्युत्तर ख्वाजा आसिफ यांच्या विधानानंतर भारतात असलेले इस्रायलचे राजदूत रूवेन अझार यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘गाझा शांतता योजने’अंतर्गत आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलात पाकिस्तानी सैन्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला इस्रायलने स्पष्ट नकार दिला आहे. “ज्या देशाच्या सैन्याचे हमास आणि लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत, त्यांच्या सहभागाने आम्ही कधीही समाधानी राहू शकत नाही,” असे अझार यांनी ठणकावून सांगितले. हेही वाचा : ‘बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी’; बड्या नेत्याच्या विधानाने वाद, राऊतांनी टोचले कान; मुंबईत काय घडलं?