जामखेड – जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वराच्या पावनभूमीत कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड या शाळेत दि.22 रोजी दुपारी करण्यात आले आहे.. मध्य प्रदेश, हरियाणा व पंजाब या राज्यातील नामांकित पैलवान या मैदानासाठी उपस्थित राहून कुस्त्या खेळणार आहेत.
या जंगी कुस्ती मैदानाचे अध्यक्ष, आमदार प्रा.राम शिंदे असतील. या कुस्तीच्या जंगी मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. सुरेश धस, आ. रोहित पवार, आ. बाळासाहेब आजबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या कुस्ती मैदानामध्ये कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवलेल्या सन्माननीय व्यक्ती, तसेच पैलवान यांचा सुद्धा सन्मान होणार आहे.
जागतिक पोलीस आणि फायर गेम विजेते महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, राहुल आवारे, नरसिंग यादव, रोहित पटेल (हिंद केसरी) तसेच आशियाई कुस्ती स्पर्धेतील चॅम्पियन सुजय तनपुरे यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश, हरियाणा व पंजाब या राज्यातील नामांकित पैलवान या मैदानासाठी उपस्थित राहून कुस्त्या खेळणार आहेत. कुस्ती शौकीनांसाठी ही पर्वणी असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुस्ती मैदानाचे आयोजक अजय (दादा) काशीद यांनी केले आहे.