तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गायब; पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा

Tuljabhavani Temple | महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील खजिना खोलीतून शस्त्र पूजनासाठी वापरली जाणारी विशेष तलवार गहाळ झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक पुजाऱ्यांनी केला आहे. ही तलवार मंदिर संस्थानाच्या खजाना खोलीतून गायब झाली आहे. दरम्यान, ही तलवार केवळ धार्मिकच नव्हे, तर अध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाची मानली जाते.
पुजाऱ्यांचा नेमका आरोप काय?
पद्मश्री गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्याकडून पूजा करून घेत शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकली आहे. तसंच होम हवन करून तुळजाभवानीची शक्ती तलवारीमध्ये काढून घेतल्याचा दावाही पुजाऱ्यांनी केला आहे. मंत्रोपचाराने देवीच्या 8 शस्त्रातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून देवीची तलवार गहाळ केल्याचा आरोपही पुजाऱ्यांनी केला आहे. पुजाऱ्यांच्या या दाव्यामुळे तुळजापुरात एकच खळबळ उडाली आहे. Tuljabhavani Temple |
दरम्यान, तलवार खजिना खोलीतून नेमकी कशी गायब झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र गायब झालेली तलवार तात्काळ देवीच्या चरणी परत आणण्यात यावी, अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे. Tuljabhavani Temple |
हेही वाचा :
Yawat : यवतमध्ये तणावपूर्ण शांतता! आठवडे बाजार शाळांना सुट्टी, जमावबंदीचे आदेश लागू





