Pimpri News : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उद्या वाहतुकीत बदल ; हा मार्ग राहाणार पूर्ण बंद,जाणून घ्या…पर्याय काय?

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उद्या (सोमवारी) तुळजाभवानी मंदिर, पिंपळे गुरव येथे दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सांगवी वाहतूक विभागाने तात्पुरत्या वाहतूक बदल जाहीर केले आहेत.पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत खालील मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी राहील. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र पिंपळे गुरव चौकातून तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद असेल.
त्यासाठी पर्यायी मार्ग: बँक ऑफ महाराष्ट्र चौकातून उजवीकडे वळून काशी विश्वेश्वर चौकमार्गे प्रवास करावा.तर सृष्टी चौकातून तुळजाभवानी मंदिर समोरून भैरवनाथ कमानीकडे जाणारा मार्ग बंद राहील. त्यासाठी पर्यायी मार्ग: सृष्टी चौकातून सरळ ६० फुटी रोडने रामकृष्ण मंगल कार्यालय चौकमार्गे प्रवास करता येईल.वाहतूक शाखेने नागरिकांना विनंती केली आहे की, मिरवणुकीच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे. तसेच बदलाबाबत सांगवी वाहतूक विभागाकडून बॅरिकेटिंग आणि मार्गदर्शन फलक लावण्यात येणार आहेत.





