तुळजाभवानी मंदिरात चक्क उंदरांचा संचार; ऑनलाइन दर्शनादरम्यान समोर आलं सत्य

TuljaBhavani Temple | तुळजाभवानी मंदिरात चक्क उंदरांचा संचार पाहायला मिळाला. मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार असल्याचं तुळजाभवानी मातेच्या ऑनलाइन दर्शनादरम्यान दिसून येत आहे. देवीच्या मूर्तीवर चक्क उंदीर आढळून आले आहेत.
मंदिर बंद केल्यानंतर रात्रभर उंदीर तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात वावरत असल्याचं ऑनलाइन दर्शनातून स्पष्ट दिसून येत आहे. या उंदरांमुळे तुळजाभवानी मातेच्या प्राचीन अलंकाराचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या भावनगर येथील हितेश भाई जानी या भाविकाला ऑनलाइन दर्शनादरम्यान हा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी त्यांनी नाराजी व्यक्त करत उंदरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. TuljaBhavani Temple |
याचा व्हिडीओ समोर येताच या प्रकरणावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र मंदिर प्रशासनने यावर काहीच अॅक्शन का घेतली नाही? असा सवाल केला जात आहे. TuljaBhavani Temple |
हेही वाचा :





