Drishyam 3 : बॅालीवूडमध्ये थ्रीलर चित्रपटाने आपले स्थान कायम ठेवले असून, गेल्या काही वर्षांपासून या जॅानरमधील चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर मोठा प्रभाव पाडताना दिसत आहेत. खासकरून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हा जॅानर अधिक असल्याने त्यांचा हात कोणी धरू शकत नाही, अशी स्थिती आहे. सध्या बॅालीवूडमध्ये या चित्रपटांचा ओघ वाढत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दृश्यम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अक्षरशः चित्रपटाने नवा आयाम सर्वांसमोर मांडला. बॅालीवूडमध्येही दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक दृश्यम तयार करण्यात आला. चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाला मोठे यश मिळाले तर अनेकांच्या फेव्हरेस्ट लिस्टमध्ये चित्रपटाने स्थान मिळवले. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. याही चित्रपटाला मोठा प्रतिसाद प्रेक्षकांना दिला. आता दृश्यम ३ बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दृश्यम चित्रपटाच्या दोन्ही भागांचा मिळालेल्या प्रतिसादानंतर तिसऱ्या भागावर काम करण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दृश्यम ३ बाबत माध्यमांमध्ये बातम्या समोर येत आहेत. दृश्यमची खासियत म्हणजे सस्पेन्स आणि थ्रिल आहे. पाच महिन्यांपूर्वी दाक्षिणात्य दृश्यम ३ च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे बॅालीवूडमध्ये दृश्यम ३ मध्ये पुन्हा एकदा अजय देवगणला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. दिग्दर्शकाने लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. दाक्षिणात्य दृश्यम ३ तयार केला जात असून चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरूवात झाली आहे. चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित केला जाऊ शकतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॅालीवूडचा दृश्यम ३ प्रदर्शित होऊ शकते अशी माहिती आहे. मात्र, अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हेही वाचा : ‘मला कोणी धमकावू शकेल असे वाटत नाही’ ; सरन्यायाधीश असं का म्हणाले?, वाचा