कन्फर्म! ‘दृश्यम 3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, साऊथ सुपरस्टारने केली घोषणा

Drishyam 3 | मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी ‘दृश्यम 3’ चित्रपटाची घोषणा केली आहे. 2013 साली मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला मूळ मल्याळम भाषेतील ‘दृश्यम’ चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. मल्याळम भाषेतील या दोन्ही चित्रपटांचे हिंदी रिमेकही विशेष गाजले.
चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि इशिता दत्ता यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ‘दृश्यम’ चित्रपटातील क्लायमॅक्स आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला आहे.
‘दृश्यम’ या मूळ चित्रपटासह हिंदी रिमेकनेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता ‘दृश्यम 3’ ची घोषणा करण्यात आली आहे. सुपरस्टार मोहनलाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमाची घोषणा केली.
The Past Never Stays Silent
Drishyam 3 Confirmed!#Drishyam3 pic.twitter.com/xZ8R7N82un
— Mohanlal (@Mohanlal) February 20, 2025
‘The Past Never Stays Silent..’ असे कॅप्शन देत मोहनलाल यांनी ‘दृश्यम 3’ ची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जीसू जोसेफ हे करणार आहेत. तर निर्माते अँटनी पेरुंबवूर हे आहेत.
2013 साली मूळ मल्याळम भाषेतील ‘दृश्यम’ चित्रपट गाजल्यानंतर इतर भाषेतही याचे रिमेक करण्यात आले. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, सिंहली या भाषेत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. एवढेच नाही तर चीनमध्येही या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला. 2021 मध्ये ‘दृश्यम-2’ रिलीज झाला होता. आता ‘दृश्यम 3’च्या घोषणेनंतर अभिनेता अजय देवगण हिंदीमध्येही चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची निर्मिती करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





