Shriya Saran : दृश्यम हा क्राइम थ्रिलर चित्रपट त्याच्या तिसऱ्या भागासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, लवकरच ते पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. साळगावकर कुटुंबात तिसऱ्या भागात काय घडणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री श्रिया सरन हिने आपल्या भावना एका मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत. दृश्यमच्या दोन्ही भागात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री श्रिया सरन हिने साकारली आहे. ती चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असून तिने चित्रपटाच्या प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना श्रिया सरनने म्हणाली “मी खूप उत्साहित आहे. यावेळी कथा खूपच छान लिहिली आहे, खूप घट्ट आणि मनोरंजक आहे. फ्रँचायझीमधील हा शेवटचा भाग आहे. आम्ही सध्या त्याचे चित्रीकरण करत आहोत. चित्रपटात काम करण्याच्या प्रवासाबाबत श्रिया सिरनने हा माझ्यासाठी खूप भावनिक प्रवास असल्याचे सांगितले. श्रिया म्हणाली की, दृश्यमला वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे सस्पेन्स शैलीतील कथानकात त्याचा अनोखा दृष्टिकोन. मला तीन भाग असलेली एकही मिस्ट्री फ्रँचायझी आठवत नाही. आपण ड्रामा मालिका पाहिली आहे, पण एक मिस्ट्री फ्रँचायझी जिथे संपूर्ण कथा एका छोट्या घटनेभोवती फिरते ती आश्चर्यकारक आहे, असे ती म्हणाली. २०१५ मध्ये दृश्यम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता यांचा अफलातून अभिनय प्रेक्षकांना भारावून टाकणारा होता. या चित्रपटावर खूप प्रेम प्रेक्षकांनी केले. त्यानंतर २०२२ मध्ये दृश्यम २ प्रदर्शित झाला. त्यात अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत झळकला होता. आता जवळजवळ चार वर्षांनंतर या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हेही वाचा : Economic survey : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले आर्थिक सर्वेक्षण ; जीडीपी ६.८% ते ७.२% राहण्याचा अंदाज