मिस्टर परफेक्शनिस्टची बॅालीवूडमधून निवृत्तीची घोषणा? तो एक प्रश्न अन् आमिरने स्पष्टचं दिलं उत्तर

Aamir Khan : नुकतीच बॅालीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने एका वाहिनीवर मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान त्याने त्याचा आगामी चित्रपट महाभारत हा शेटवचा चित्रपट ठरू शकतो अशी हिंट दिली आहे. यामुळे आता आमिर बॅालीवूडला कायमचा अलविदा करून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चाणा उधाण आले आहे. यामुळे त्याच्या चाहते देखील नाराज झाले आहेत.
जूनमध्ये आमिरचा सितारे जमीन पर हा चित्रपट रिलीज होणार असून त्यानंतर लगेचच तो महाभारत या चित्रपटावर कामाला सुरूवात करणार आहे. महाभारत हा चित्रपट आमिर खानचा शेवटचा चित्रपट असणार असल्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच आमिरने महाभारत चित्रपटात कृष्णाची भूमिका करायला आवडेल असे सांगितले होते. तो या चित्रपटाला घेऊन तो खूप गंभीर आहे. मात्र, अद्यापर्यंत या चित्रपटात त्याच्या भूमिकेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
तसेच या चित्रपटातील इतरही कलाकारांची अधिकृत नावे समोर आलेली नाहीत. लवकरच महाभारत चित्रपटातील कलाकारांची नावे समोर येतील असे बोलले जात आहे. आमिरने हा चित्रपट दोन भागात होणार असल्याचे सूचित केले होते. तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी अनेक दिग्दर्शक एकत्र येऊन एक टीम म्हणून काम करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले होते.
‘महाभारत’ नंतर त्याला असे वाटेल की, “आता माझ्याकडे करण्यासारखे काहीच उरले नाही.” या विधानामुळे त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या शेवटच्या शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.





