Director Rono Mukherjee passes away : बॅालीवूडमधील एका बड्या दिग्दर्शकाच्या निधनाची बातमी समोर आली आहे. दिग्गज चित्रपट दिग्दर्शक रोना मुखर्जी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनाने बॅालीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. दिग्दर्शक रोनो मुखर्जी हे अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल यांचे काका होते. त्यांच्या जाण्याने मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोनो मुखर्जी हे बॉलीवूड अभिनेत्री शर्बानी मुखर्जी यांचे वडील होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मुखर्जी कुटुंबीयांनी त्यांच्या घरी धाव घेतली आहे. रोनो मुखर्जी यांनी बॅालीवूडमध्ये अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. हैवान आणि तू मेरी जिंदगी हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. रोनो मुखर्जी हे अभिनेत्री काजालोचे वडील शोमू मुखर्जी यांचे भाई होते.