गायकाने भरकॉन्सर्टमध्ये तारा सुतारिया केलं किस; वीर पहारियाची रिअॅक्शन व्हायरल

Singer AP Dhillon | प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोंचा मुंबईत लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. या कॉन्सर्टला तारा सुतारिया आणि वीर पहारिया देखील गेले होते. या कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लों गाणे गाताना ताराला स्टेजवर बोलावतो. यावेळी एपीच्या खांद्यावर हात ठेवून तारा देखील कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसते.
यादरम्यान एपी ढिल्लों ताराला मिठी मारतो आणि तिच्या गालावर किस करतो. तिच्यासोबत स्टेजवर नाचतो. तारा सुतारिया आणि एपी ढिल्लोंचा हा अंदाज कॉन्सर्ट पाहायला आलेला वीर पहारिया देखील पाहतो. मात्र आपल्या गर्लफ्रेंडची गायकासोबत अशी जवळीक पाहून वीर पहारिया चांगलाच संतापतो.त्याच्या रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
तारा सुतारियाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने लिहिलं की, “वीर अस्वस्थ दिसत आहे” तर दुसऱ्याने, “बिचारा टेंशनमध्ये आला”, असे लिहिले आहे. दरम्यान, तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांचे नाते सोशल मीडियावर जाहीर केले होते. Singer AP Dhillon |
हेही वाचा :





